महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Feb 13, 2024
1:41PM

पाकिस्तानातल्या सार्वत्रिक निवडणुकीचे अंतिम निकाल जाहीर

newsonair
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानं सार्वत्रिक निवडणुकीचे अंतिम निकाल काल जाहीर केले. सर्व पक्षांचं संख्याबळ लक्षात घेता संसदेत स्पष्ट कौल कोणत्याच पक्षाला नसल्यामुळे आघाडी सरकारशिवाय गत्यंतर नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्या देशातील संसदेच्या २६६ जागांपैकी ९३ जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. हे बहुतांश अपक्ष उमेदवार इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिके इन्साफ म्हणजे पीटीआय पक्षाचा पाठिंबा असलेले आहेत. पाकिस्तान मुस्लिम लीग नवाझ पक्षाला ७५, तर पाकिस्तान पीपल्स पार्टीला ५४ जागा मिळाल्या आहेत.

पाकिस्तान मुस्लिम लीग नवाझ पक्षाला लष्कराचा पाठिंबा आहे, पण पीटीआय पक्षालाही पूर्ण बहुमत नसल्यामुळे कोणत्या तरी दोन पक्षांना एकत्र यावं लागणार आहे. दरम्यान, सार्वत्रिक निवडणूक गुरुवारी होऊनसुद्धा त्याचे अंतिम निकाल जाहीर करायला निवडणूक आयोग विलंब लावत असल्यामुळे त्यामागं काही तरी काळंबेरं असल्याचाही आरोप करण्यात आला होता. दिशाहीन निकाल लक्षात घेता पाकिस्तानात राजकीय अस्थिरता बराच काळ कायम राहील असं विश्लेषकांचं म्हणणं आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1