महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री आज राज्याच्या दौऱ्यावर            संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात            ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुक मतमोजणीतील ३ राज्यांमध्ये भाजपाचं वर्चस्व            पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत केनिया आणि इथियोपियाच्या धावपटूंचं वर्चस्व            ऑस्ट्रेलिया विरुद्धची वीस षटकांची क्रिकेट मालिका भारतानं ४-४ नं जिंकली.           

Sep 23, 2023
9:41AM

पन्नास षटकांच्या क्रिकेट मालिकेत भारताची ऑस्ट्रेलियावर आघाडी

AIR
भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान पन्नास षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील काल मोहाली इथल्या पहिल्या सामन्यात भारतानं पाहुण्यांवर ५ गडी राखून विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या २७६ धावांचा पाठलाग करताना भारतानं ८ चेंडू शिल्लक असताना ५ गडी बाद २८१ धावा करून विजयावर शिक्कामोर्तब केलं. शुभमन गिलच्या ७४ आणि रुतुराज गायकवाडच्या ७१ धावांनी भारताला बळ दिलं. चार भारतीय फलंदाजांनी अर्धशतकं केली. के. एल. राहुलनं ५८, तर शिवकुमार यादवनं ५० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचे पाच गडी बाद करणारा मोहम्मद शामी सामनावीर ठरला. भारत या मालिकेत १-० असा पुढं आहे.  पुढील दोन महिन्यांमध्ये भारतात होणाऱ्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी दोन्ही संघांकरिता ही मालिका म्हणजे रंगीत तालीम आहे. के एल राहुल पहिल्या दोन सामन्यांसाठी भारताचा कर्णधार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या यांना विश्रांती देण्यात आली आहे. दुसरा सामना उद्या रविवारी इंदूर इथं होईल तर अंतिम सामना २७ तारखेला राजकोट इथं होईल. विश्वकरंडक स्पर्धेतही दोन्ही संघ आपला पहिला सामना ८ ऑक्टोबरला चेन्नई इथं खेळतील. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1