महत्वाच्या घडामोडी
खेळांप्रती दृष्टीकोनात दिवसोंदिवस बदल होत असून त्याचं प्रतिबिंब भारताच्या क्रीडा कामगिरीत पहायला मिळत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन            सायबर दहशतवाद आणि आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी जागतिक कायदेशीर चौकट तयार करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन            G-20 शिखर परिषदेच्या यशाचं श्रेय G-20 संघाच्या सामूहिक प्रयत्नांना असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन            'वन नेशन वन इलेक्शन' समितीची पहिली बैठक नवी दिल्लीत संपन्न            शाश्वत पद्धतींना चालना देण्यासाठी, केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागानं १० किनारी राज्यांतील ७३२ कृत्रिम भित्तिका केंद्र केली मंजुर           

Jun 08, 2023
8:11PM

नैऋत्य मोसमी पाऊस केरळमधे दाखल

Air

नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण अऱबी समुद्राच्या उर्वरित भागात पुढं सरकला असून, संपूर्ण लक्षद्वीप, तसंच केरळ आणि दक्षिण तामिळनाडूच्या बहुतांश भागात पोचला आहे. सामान्यतः मान्सून केरळमधे १ जूनला पोचतो मात्र यावेळी तो आठवडाभर उशिरानं, आज पोचला असल्याचं हवामान विभागाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. गेल्या चोवीस तासात, केरळमधे बहुतांश भागात पाऊस पडला. येत्या दोन दिवसात मान्सून पुढं सरकत, केरळचा उर्वरित भाग, तामिळनाडू आणि कर्नाटकाच्या काही भागात तसंच नैऋत्येकडच्या आणखी काही भागात पोचेल. त्याचवेळी तो बंगालच्या उपसागराच्या मध्य आणि ईशान्य भागात तसंच ईशान्येकडच्या राज्यांच्या काही भागात पोचेल, असा अंदाज आहे. 

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1