महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री आज राज्याच्या दौऱ्यावर            संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात            ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुक मतमोजणीतील ३ राज्यांमध्ये भाजपाचं वर्चस्व            पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत केनिया आणि इथियोपियाच्या धावपटूंचं वर्चस्व            ऑस्ट्रेलिया विरुद्धची वीस षटकांची क्रिकेट मालिका भारतानं ४-४ नं जिंकली.           

Sep 24, 2023
12:43PM

नारी शक्ती वंदन अधिनियमामुळे देशाची लोकशाही आणखी सक्षम – पंतप्रधान

AIR
नारी शक्ती वंदन अधिनियम हा एक व्यापक दृष्टी असलेला कायदा असून त्यामुळे आपली लोकशाही आणखी सक्षम  करेल आणि भारतीय विधानमंडळांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्वही सक्षम करेल, असं  मत  पंतप्रधान  नरेंद्र  मोदी  यांनी  म्हटलं  आहे. ते काल  वाराणसी  इथं  महिलांशी झालेल्या संवाद कार्यक्रमात बोलत  होते. यावेळी  त्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी करण्यात आली. तसंच 1500 कोटींहून अधिक रुपयांच्या विकास कार्यक्रमाचा शुभारंभ पंतप्रधानांच्या  हस्ते करण्यात  आला. 

केंद्र  सरकारनं  क्रीडा  प्रकारांना  तरुणांच्या करिअर आणि शारीरिक  तंदुरुस्तीशी  जोडल्याने  देशभरातील खेळाडुंमध्ये  उत्साहाचं वातावरण  आहे, असं सांगत  पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा क्रीडाविषयक पायाभूत सुविधा तयार केल्या जातात तेव्हा त्याचा सकारात्मक  परिणाम फक्त  युवा क्रीडा प्रतिभेला जोपासण्यावरच होत नाही तर  स्थानिक अर्थव्यवस्थेवर देखील त्याचा सकारात्मक परिणाम होतो. त्यानंतर  एक अन्य  कार्यक्रमात  त्यांच्या  हस्ते  काशी संसद सांस्कृतिक महोत्सवाच्या विजेत्यांना पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं.

यावेळी  बोलताना  पंतप्रधान म्हणाले की, भविष्यात काशी संसद ज्ञान प्रतियोगिता आयोजित करण्यात येणार  असून काशीच्या ग्रामीण आणि शहरी भागात वेगवेगळ्या स्तरावर त्याचं आयोजन केलं जाईल. तसंच  काशीच्या समृद्ध संस्कृतीबद्दल लोकांना अधिक माहिती व्हावी यासाठी काशी संसद टुरिस्ट गाईड स्पर्धाही आयोजित केली जाईल, असंही  पंतप्रधान मोदी  यावेळी म्हणाले.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1