महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री आज राज्याच्या दौऱ्यावर            संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात            ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुक मतमोजणीतील ३ राज्यांमध्ये भाजपाचं वर्चस्व            पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत केनिया आणि इथियोपियाच्या धावपटूंचं वर्चस्व            ऑस्ट्रेलिया विरुद्धची वीस षटकांची क्रिकेट मालिका भारतानं ४-४ नं जिंकली.           

Sep 23, 2023
1:53PM

नागपूर शहरात मुसळधार पाऊस

AIR
नागपूर आणि परिसरात काल रात्री दोन वाजता सुरू झालेल्या संततधार पावसामुळे शहराच्या सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. केवळ चार तासांत १०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाला असून जिल्हा आणि महानगर प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन चमू कार्यरत आहे. आज सकाळीच जिल्हाधिकारी आणि महानगर पालिका आयुक्तांनी शहरातील अनेक भागांची पाहणी केली. शहरासह जिल्ह्यातील परिस्थितीवर आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष ठेवून आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांना  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज सुट्टी जाहीर केली आहे. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना आधी तातडीने मदत करण्याच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. तातडीने बचाव कार्य सुरू करण्यासाठी एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची एक आणि राज्य आपत्ती निवारण दलाच्या दोन चमू शहरात बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मनपाकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती पाण्याखाली गेली असून, अनेक रस्ते पाणी साचून बंद झाले आहेत. वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्यामुळे गोसीखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले आहेत.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1