महत्वाच्या घडामोडी
धावपटू मिल्खा सिंग यांचं निधन            यंदापासून अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी मराठी माध्यमाचा पर्याय            इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराबाबत सर्वंकष धोरण सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश            राज्यात कोविड 19 च्या पॉझिटीव्हिटी दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट, सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती            सारथीच्या योजनांना कुठेही पैसा कमी पडू दिला जाणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मराठा आंदोलकांच्या प्रतिनिधींना आश्वासन           

Jun 11, 2021
7:59PM

नंदुरबार जिल्ह्यातल्या ३ गावांनी ४५ वर्षावरील लसीकरणाचे निर्धारीत केलेले उदिष्ट १०० टक्के साध्य

Twitter
आदिवासी बहूल नंदुरबार जिल्ह्यातल्या सिंद गव्हाण, पुरूषोत्तमनगर आणि सागळीया तीन गावांनी ४५ वर्षावरील लसीकरणाचे निर्धारीत केलेल उदिष्ट १०० टक्के साध्य केलं आहे. आदिवासी बहुल भागात लसीकरणाबाबत असलेले गैरसमज आणि अफवा यांच्यावर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नांद्वारे मात केली आहे.

लसीकरण केल्यामुळे कोरोना होतो, लस घेतल्यानंतर ताप आला आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले तर तो रुग्ण जिवंत परत येत नाही, अशा प्रकारच्या अफवांमुळे सुरुवातीला नागरिकांनी लसीकरणाला प्रतिसाद दिला नाही. पण समुपदेशन केल्यानंतर लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला, अशी माहिती  जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौदळ यांनी दिली.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-19 Jun 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.6 25.3
मुंबई 33.0 25.0
चेन्नई 35.4 28.6
कोलकाता 30.1 25.2
बेंगलुरू 28.0 20.8