महत्वाच्या घडामोडी
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र आजपासून देशभरातल्या १ लाख ५९ हजार टपाल कार्यालयात उपलब्ध            गेल्या महिन्यात देशभरातून १ लाख ६० हजार कोटींहून अधिक जीएसटी संकलित            नव्या धोक्यांचा सामना करण्यासाठी लष्कर, नौदल आणि हवाई दलाला तयार राहण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सूचना            देशातली आणखी काही वनं, वाघ अभयारण्य म्हणून जाहीर करण्याचा केंद्र सरकारचा मानस            अरबी समुद्रात सापडलेल्या बोटीत एकही पाकिस्तानी खलाशी नसल्याचं स्पष्ट           

Feb 02, 2023
8:45PM

देशाच्या ग्रामीण भागातल्या ११ कोटी ५ लाखापेक्षा जास्त घरांमधे नळाने पाणीपुरवठा होत आहे- केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री

@pspoffice
देशाच्या ग्रामीण भागातल्या ११ कोटी ५ लाखापेक्षा जास्त घरांमधे नळाने पाणीपुरवठा होत असल्याची माहिती केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी दिली आहे. लोकसभेत आज एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी सांगितलं की जल जीवन मिशन सुरु होण्यापूर्वी  ग्रामीण भागातल्या ३ कोटी २३ लाख घरांमधे नळाने पाणीपुरवठा होत होता. त्यात आता ७ कोटी ८१ लाख पेक्षा जास्त घरांची भर पडली असून  या मिशनच्या माध्यमातून २०२४ पर्यंत ग्रामीण भागातल्या सर्व घरांमधे नळाने पाणीपुरवठा होईल. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1