महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Feb 13, 2024
1:42PM

जीईएम पोर्टलवरील व्यवहारांचं मूल्य ३ लाख कोटी रुपयांवर

AIR
चालु आर्थिक वर्षात जेम या सरकारी ई बाजारपेठेत तीन लाख कोटी रुपयांच्या जीएमव्ही अर्थात स्थूल व्यापारमाल मूल्याची नोंद झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात दोन लाख कोटी रुपये इतका जीएमव्ही होता. जेमचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार सिंग यांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली. दैनंदिन सरासरी उलाढालीत लक्षणीय वाढ झाली आहे.५०४ कोटी रुपयांवरून ही उलाढाल चालु आर्थिक वर्षात ९१४ कोटी रुपये झाल्याचं ते म्हणाले. इलेक्ट्राॅनिक माध्यमातून सार्वजनिक खरेदी प्रक्रियेसाठीच्या या उपक्रमाचा मुख्य भर काळा बाजार, लाचखोरी असे गैरप्रकार रोखण्यावर  असल्याचं त्यांनी सांगितलं. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1