महत्वाच्या घडामोडी
धावपटू मिल्खा सिंग यांचं निधन            यंदापासून अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी मराठी माध्यमाचा पर्याय            इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराबाबत सर्वंकष धोरण सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश            राज्यात कोविड 19 च्या पॉझिटीव्हिटी दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट, सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती            सारथीच्या योजनांना कुठेही पैसा कमी पडू दिला जाणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मराठा आंदोलकांच्या प्रतिनिधींना आश्वासन           

Jun 11, 2021
11:25AM

जलजीवन अभियानांतर्गत महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून 7 हजार कोटीं रुपयांचा निधी मंजूर

Twitter

जलजीवन अभियानांतर्गत महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारनं राज्याला 7 हजार कोटींहून अधिक रुपये मंजूर केले आहेत. 2024 पर्यंत ग्रामीण भागातल्या प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी राज्याला सर्वप्रकारे मदत करण्याचं आश्वासन जल शक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी काल दिलं. या अभियानाला 2019 मध्ये सुरुवात झाली त्यावेळी, देशात ग्रामीण भागातल्या एकूण 19 कोटी 20 लाख घरांपैकी केवळ 3 कोटी 23 लाख घरांना नळजोडणी केलेली होती.

मात्र, गेल्या 21 महिन्यांमध्ये कोरोना संसर्गाची स्थिती असतानाही 4 कोटी 27 लाख घरांना नळजोड पुरवण्यात आल्याचं शेखावत यांनी सांगितलं. महाराष्ट्रात, ग्रामीण भागातल्या 142 लाख घरांपैकी जवळपास 91 लाख घरांना नळाद्वारे पाणी पुरवठा होतो. अभियानाच्या सुरुवातीला यापैकी केवळ 48 घरांना नळाद्वारे पाणी मिळत होते. गेल्या 21 महिन्यांमध्ये राज्यात 43 लाख घरांना नळजोडणी देण्यात आली.  

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-19 Jun 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.6 25.3
मुंबई 33.0 25.0
चेन्नई 35.4 28.6
कोलकाता 30.1 25.2
बेंगलुरू 28.0 20.8