महत्वाच्या घडामोडी
खेळांप्रती दृष्टीकोनात दिवसोंदिवस बदल होत असून त्याचं प्रतिबिंब भारताच्या क्रीडा कामगिरीत पहायला मिळत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन            सायबर दहशतवाद आणि आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी जागतिक कायदेशीर चौकट तयार करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन            G-20 शिखर परिषदेच्या यशाचं श्रेय G-20 संघाच्या सामूहिक प्रयत्नांना असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन            'वन नेशन वन इलेक्शन' समितीची पहिली बैठक नवी दिल्लीत संपन्न            शाश्वत पद्धतींना चालना देण्यासाठी, केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागानं १० किनारी राज्यांतील ७३२ कृत्रिम भित्तिका केंद्र केली मंजुर           

Jun 08, 2023
8:12PM

चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हर पाठवण्यासाठीची चांद्रयान ३ मोहीम जुलैच्या मध्यापर्यंत पूर्णत्वाला जाण्याचा इस्रोला विश्वास

Air
 
चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हर पाठवण्यासाठीची चांद्रयान ३ ही भारताची मोहीम जुलैच्या मध्यापर्यंत पूर्णत्वाला जाईल असा विश्वास भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी व्यक्त केला आहे.  ते आज बेंगळुरू इथं झालेल्या अंतराळ मोहिमांशी संबंधित आंतरराष्ट्रीय परिषदेत, बातमीदारांशी बोलत होते. या मोहीमेअंतर्गतच्या ऑर्बिटर, लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूलच्या चाचण्या सुरू आहेत, चाचण्यांनंतर हे सर्व घटक एलव्हीएम ३ प्रक्षेपण यानाशी जोडले जाणार आहेत, त्यासाठीचे एलव्हीएम ३ प्रक्षेपण यान या महिन्याच्या अखेपर्यंत तयार होईल आणि त्यानंतर, जुलै महिन्याच्या सुरूवातीलाच ही प्रक्रिया पूर्ण होईल, आणि मग जुलैच्या मध्यापर्यंत प्रक्षेपण करायचं नियोजन केलं आहे अशी माहिती त्यांनी दिली.
भारताच्या अंतराळ मोहीमेअंतर्गत सुर्याचा अभ्यास करण्यासाठीच्या आदित्य एल वन मोहीमेअंतर्गतचा प्रकल्प यावर्षी ऑगस्टपर्यंत किंवा पुढच्या वर्षी जानेवारीपर्यंत सुरू करणार असल्याचंही त्यांनी सांगिल. भारताची महत्वाकांक्षी गगनयान मोहीमही प्रतिपथावर असल्याची माहिती त्यांनी दिली.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1