महत्वाच्या घडामोडी
स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या एका जोडणीवर वर्षाला एकूण १५ तर महिन्याला जास्तीत जास्त २ सिलेंडर्स मिळणार            भारतीय टपाल खात्याच्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ            राज्य सरकारच्या ४४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या            राज्यात कोविड संसर्ग झालेले नवे ४५३ रुग्ण            औरंगाबाद आणि बीड इथल्या पीआयएफच्या कार्यालयाला टाळं           

Sep 23, 2022
7:57PM

चंद्रपुरात पर्यावरण पूरक प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येणार- मंत्री हरदिपसिंग पुरी

आकाशवाणी
चंद्रपुरात पर्यावरण पूरक प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदिपसिंग पुरी यांनी आज सांगितलं. ते तीन दिवसांच्या चंद्रपूर दौऱ्यावर असून आज दुसऱ्या वार्ताहर परिषदेत बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. वाढतं प्रदूषण ही चिंतेची बाब आहे. प्रदुषण कमी करण्यासाठी ग्रीन योजना आणल्या आहेत. उज्वला, बायो फ्युएल, ग्रीन हायड्रोजन, इलेक्ट्रिकल वाहन यावर सातत्यानं काम सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं. 

कोकणातला रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प चंद्रपुरात येणार असल्याच्या वृत्ताचं त्यांनी खंडन केलं. चार लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या या प्रकल्पाची क्षमता वार्षिक 60 दशलक्ष टन आहे. स्थानिक पातळीवर विरोध पाहता २०-२०-२० दशलक्ष टन असं त्रिभाजन करून एक युनिट रत्नागिरी आणि नागपूर इथं उभारलं जाऊ शकतं, असं त्यांनी स्पष्ट केलं. याबाबत संभ्रम निर्माण होऊ नये, असं पुरी यांनी सांगितलं. यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस'च्या वतीने पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यात आला. वार्ताहर परिषदेनंतर पुरी बल्लारपूरला गेले. त्यांनी प्रथम सैनिक शाळेला भेट दिली. शहरातल्या जेनरिक मेडिकल आणि रेशन दुकानांना भेट देत लाभार्थ्याशी संवाद साधला.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1