महत्वाच्या घडामोडी
स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या एका जोडणीवर वर्षाला एकूण १५ तर महिन्याला जास्तीत जास्त २ सिलेंडर्स मिळणार            भारतीय टपाल खात्याच्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ            राज्य सरकारच्या ४४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या            राज्यात कोविड संसर्ग झालेले नवे ४५३ रुग्ण            औरंगाबाद आणि बीड इथल्या पीआयएफच्या कार्यालयाला टाळं           

Sep 23, 2022
9:14PM

गेल्या काही वर्षांत बालमृत्यू दर कमी करण्यात भारताची लक्षणीय कामगिरी

airnewsalerts
भारतानं गेल्या काही वर्षांत बालमृत्यू दर कमी करण्यात लक्षणीय कामगिरी केल्याचं याबाबतच्या अहवालात म्हटलं आहे. नमुना नोंदणी प्रणाली सांख्यिकी अहवाल २०२० नुसार, २०१४ साला पासून देशात बालमृत्यू दर, नवजात बालक मृत्यु दर आणि पाच वर्षां खालच्या बालकांच्या मृत्यू दरात सातत्यानं घट होताना दिसत आहे.

२०१९ या वर्षात जन्माला आलेल्या दर हजार जीवंत  बालकांमागे ३० टक्के बाल  मृत्यू  दर नोंदवण्यात आला होता. २०२० मध्ये तो कमी होऊन २८ टक्क्यावर  आल्याचं यात म्हटलं आहे. तसंच पाच वर्षां खालच्या बालकांचा मृत्यू दर २०१९ मधील ३५ टक्क्यावरून कमी होऊन  २०२० मध्ये ३२ टक्क्यावर, तर  नवजात बाल मृत्यू दर २०१९ मधील  २२ टक्क्यावरून २०२० या वर्षात २० टक्क्यावर आल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी या यशाबद्दल देशाचं अभिनंदन केलं असून, बाल मृत्यू दर कमी करण्यासाठी अथक परिश्रम घेणारे  आरोग्य सेवक, सहाय्यक आणि जन समुदायाच्या प्रतिनिधींचे त्यांनी आभार मानले आहेत.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1