महत्वाच्या घडामोडी
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र आजपासून देशभरातल्या १ लाख ५९ हजार टपाल कार्यालयात उपलब्ध            गेल्या महिन्यात देशभरातून १ लाख ६० हजार कोटींहून अधिक जीएसटी संकलित            नव्या धोक्यांचा सामना करण्यासाठी लष्कर, नौदल आणि हवाई दलाला तयार राहण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सूचना            देशातली आणखी काही वनं, वाघ अभयारण्य म्हणून जाहीर करण्याचा केंद्र सरकारचा मानस            अरबी समुद्रात सापडलेल्या बोटीत एकही पाकिस्तानी खलाशी नसल्याचं स्पष्ट           

Feb 02, 2023
8:05PM

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत महाराष्ट्राच्या संघाची रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई

@Kheloindia
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत भोपाळमधे झालेल्या नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या ईशा टाकसाळेनं मुलींच्या दहा मीटर रायफल प्रकारात रौप्यपदक, तर स्वराज भोंडवेनं मुलांच्या २५ मीटर पिस्तूल रॅपिड फायर प्रकारात कांस्यपदक पटकावलं. 

टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या तनिषा कोटेचानं मुलींच्या एकेरीत अंतिम फेरी गाठत, पदक निश्चित केलं आहे. इंदूरमधे आज झालेल्या उपांत्य फेरीतल्या चुरशीच्या लढतीत तनिषानं हरियाणाच्या प्रिथोकी चक्रवर्तीचा ४-३ असा पराभव केला. चक्रवर्तीनं उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राच्या पृथा वर्टीकरचं आव्हान संपुष्टात आणलं. एकेरीच्या अंतिम फेरीत तनिषाची लढत दिल्लीच्या लक्षिता नारंगशी होणार आहे. तनिषानं याआधी या स्पर्धेतल्या दुहेरीत रिशा मीरचंदानी हिच्या साथीनं रौप्य पदक पटकावलं आहे. 

मुलांच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या मोदी याला उत्तर प्रदेशाच्या दिव्यांश श्रीवास्तवनं पराभूत केलं. मात्र मोदी याला कांस्यपदकासाठी खेळण्याची अजूनही संधी आहे.‌

जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या सारा राऊळ आणि रिया केळकर, तसंच मुलांमध्ये आर्यन दवंडे आणि मानस मनकवळे यांनी वैयक्तिक सर्वसाधारण विभागात अंतिम फेरीकडे आगेकूच केली. 

आर्यननं प्राथमिक फेरीत पहिलं स्थान घेताना ६९ पूर्णांक ७ दशांश गुणांची कमाई केली. तर, मानस चौथ्या स्थानावर असून त्याचे ६६ पूर्णांक ६ धशांश गुण झाले आहेत. मुलींमध्ये सारानं ४० पूर्णांक ४ दशांश गुणांसह दुसरं स्थान मिळवलं, तर तिसऱ्या स्थानावर असलेल्या रियानं ४० पूर्णांक २ दशांश गुण घेतले आहेत.

मुष्टीयुद्ध स्पर्धेत महाराष्ट्राच्या अन्वर शेख आणि उस्मान अन्सारी यांनी उपांत्य फेरी धडक मारत दोन पदकं निश्चित केली. 

बास्केटबॉलमधे, सलग दोन पराभवामुळे आव्हान संपुष्टात आलेल्या महाराष्ट्राच्या मुलींनी अखेरच्या साखळी सामन्यात राजस्थानवर ८९-५८ असा विजय मिळवला. महाराष्ट्राच्या विजयात पुन्हा एकदा अनन्या  भावसार हिनं सर्वाधिक गुणांची नोंद केली. तिनं आज ३३ गुण नोंदवले. तिला गुंजन मंत्रीने १७ आणि भूमिका सर्जेने १६ गुण नोंदते सुरेख साथ केली. 

बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्राच्या नाईशा कौरनं अवघ्या ३५ मिनिटात पाचव्या अंतिम फेरी गाठली. तिनं गटातल्या महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात गार्गीचा पराभव करत पदार्पणातच पदकाची संधी मिळवली आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1