महत्वाच्या घडामोडी
धावपटू मिल्खा सिंग यांचं निधन            यंदापासून अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी मराठी माध्यमाचा पर्याय            इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराबाबत सर्वंकष धोरण सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश            राज्यात कोविड 19 च्या पॉझिटीव्हिटी दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट, सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती            सारथीच्या योजनांना कुठेही पैसा कमी पडू दिला जाणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मराठा आंदोलकांच्या प्रतिनिधींना आश्वासन           

Jun 11, 2021
12:22PM

कोविन पोर्टलवर सायबर हल्ला झालेला नसल्याचे केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

आकाशवाणी

कोविन पोर्टलवर सायबर हल्ला होऊन ते हॅक झाल्याचं काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेलं वृत्त खोटं असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. प्रथमदर्शनी, असा प्रकार झाला नसल्याचं दिसून येत असलं तरीही, लसीकरणाबाबतचा अधिकार गट हा इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या पथकाच्या साह्यानं त्याबाबत चौकशी करत असल्याचंही काल सांगण्यात आलं.

लसीकरणाबाबतची नागरिकांची सर्व माहिती अत्यंत सुरक्षित असल्याचं लसीकरणाबाबतच्या अधिकार गटाचे प्रमुख आर. एस. शर्मा यांनी स्पष्ट केलं. कोविन पोर्टलवरील माहिती दुसऱ्या कोणत्याही कंपनीला मिळालेली नाही. तसंच, लाभार्थींच्या राहण्याच्या ठिकाणाची माहिती चोरली गेल्याचा दावा केला जात असला तरी अशी माहिती कोविन पोर्टलवर गोळाच केली नसल्याचं शर्मा यांनी सांगितलं.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-19 Jun 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.6 25.3
मुंबई 33.0 25.0
चेन्नई 35.4 28.6
कोलकाता 30.1 25.2
बेंगलुरू 28.0 20.8