महत्वाच्या घडामोडी
कायदेमंडळात महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्याच्या मुद्यावर काळजीपूर्वक विचार करण्याची गरज असल्याचं केंद्र सरकारकचं स्पष्टिकरण            मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २० हजाराहून अधिक खारफुटीची झाडं तोडायला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी            महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी महाविकास आघाडीची दहा डिसेंबरला आंदोलनाची हाक            मंडौस चक्रीवादळ आज मध्यरात्रीपासून उद्या पहाटेपर्यंत ममल्लापुरमजवळ पोचण्याची शक्यता            मानवाधिकारांना चालना देण्यासाठी प्रत्येकानं समर्पित भावनेनं काम करण्याचं जगदीप धनखड यांचं आवाहन           

Nov 24, 2022
7:44PM

कोल्हापूर जिल्ह्याच्या क्रीडा विकासासाठी 'विशेष पॅकेज' देण्यासाठी प्रयत्न करु- मंत्री दीपक केसरकर

आकाशवाणी
कोल्हापूर जिल्ह्याच्या क्रीडा विकासासाठी 'विशेष पॅकेज' देण्यासाठी प्रयत्न करु असं आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज दिलं. कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीनं आज पालकमंत्र्यांनी शहरात विविध ठिकाणांना भेटी देऊन पाहणी केली. पंचगंगा घाट, शाहू तालीम, मोतीबाग तालीम, शाहू मिल, अंबाबाई मंदिर या परिसराचा त्यात समावेश होता.

कोल्हापूरला खेळाचा वारसा आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत खाशाबा जाधवांनी कुस्तीमध्ये पहिलं पदक आपल्या देशाला मिळवून दिलं. भविष्यात देशाला ऑलिंपिकमध्ये अधिकाधिक सुवर्णपदके मिळवून देण्यासाठीचे खेळाडू कोल्हापूरच्या मातीत घडण्यासाठी आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा देण्यात येतील, असं केसरकर यांनी सांगितलं.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1