महत्वाच्या घडामोडी
स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या एका जोडणीवर वर्षाला एकूण १५ तर महिन्याला जास्तीत जास्त २ सिलेंडर्स मिळणार            भारतीय टपाल खात्याच्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ            राज्य सरकारच्या ४४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या            राज्यात कोविड संसर्ग झालेले नवे ४५३ रुग्ण            औरंगाबाद आणि बीड इथल्या पीआयएफच्या कार्यालयाला टाळं           

Sep 23, 2022
8:01PM

केंद्र सरकारकडून ‘आरोग्य मंथन २०२२’ कार्यक्रमाचं आयोजन

airnewsalerts
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला ४ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त केंद्र सरकारनं ‘आरोग्य मंथन २०२२’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाचं उदघाटन येत्या रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते होणार आहे.

दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवरच्या आरोग्य सेवा क्षेत्रातल्या तज्ञांसह शैक्षणिक, बुद्धिजीवी, उद्योग तसंच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आयुष्मान भारत योजनेंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या कुटुंबांना ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा प्रदान केला जातो.

अशाप्रकारे देशभरातल्या १० कोटींहून अधिक कुटुंबांना लाभ मिळवून देणं, हा या योजनेचा उद्देश आहे. ही योजना  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सप्टेंबर २०१८ दरम्यान सुरु करण्यात आली होती. 

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1