महत्वाच्या घडामोडी
स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या एका जोडणीवर वर्षाला एकूण १५ तर महिन्याला जास्तीत जास्त २ सिलेंडर्स मिळणार            भारतीय टपाल खात्याच्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ            राज्य सरकारच्या ४४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या            राज्यात कोविड संसर्ग झालेले नवे ४५३ रुग्ण            औरंगाबाद आणि बीड इथल्या पीआयएफच्या कार्यालयाला टाळं           

Sep 23, 2022
7:54PM

कॅनडामध्ये जाणाऱ्यांनी सतर्क राहून स्वतःची काळजी घेण्याची सूचना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची सूचना

airnewsalerts
कॅनडा मध्ये शिकायला जाणारे भारतीय विद्यार्थी आणि प्रवाशांनी सतर्क राहून स्वतःची काळजी घ्यावी अशी सूचना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं केली आहे. कॅनडामधले वाढते द्वेषमूलक गुन्हे, सांप्रदायिक हिंसाचार आणि भारत-विरोधी कारवाया या पार्श्वभूमीवर मंत्रालयानं आज हे निर्देश जारी केले.

परराष्ट्र मंत्रालय, कॅनडामधलं भारतीय उच्चायुक्तालय आणि महावाणिज्य दूतावासानं या घटनांबाबत कॅनडाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असून त्यांनी या गुन्हांचा तपास करून आवश्यक ती कारवाई करावी अशी विनंती केली आहे. या हिंसक घटनांना कारणीभूत ठरलेल्या गुन्हेगारांना कॅनडा इथल्या न्याय यंत्रणेनं अद्याप कुठलीही शिक्षा दिली नसल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. 

कॅनडामधल्या भारतीय नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी ओटावा इथलं  भारतीय उच्चायुक्तालय अथवा टोटोन्टो आणि व्हॅन्कुव्हर इथल्या महा वाणिज्य दूतावासाची वेबसाईट किंवा माडाड (MADAD) पोर्टलवर आपली नोंदणी करावी. त्याच्या मदतीनं त्यांच्याशी संपर्क साधता येईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे.  

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1