महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रोजगार मेळाव्याद्वारे देशभरातल्या ५१ हजार युवकांना नियुक्तीपत्र वितरित            अनुसुचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करणाऱ्या धनगर समाजातल्या नागरिकांचं उपोषण मागे            गणेश विसर्जनानिमित्त मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी            यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहेमान यांना जाहीर            १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत घोडेस्वारीमध्ये भारतीय संघाला ४० वर्षांनंतर सुवर्ण पदक           

Jun 08, 2023
7:40PM

कसोटी क्रिकेट विश्व चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या, पहिल्या डावात ४६९ धावा

Air

कसोटी क्रिकेट विश्व चषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कालपासून लंडनमधे सुरु झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव आज ४६९ धावांवर संपला. कालच्या तीन बाद ३२७ धावांवरुन ऑस्ट्रेलियानं आज पुढं खेळायला सुरुवात केल्यानंतर स्टीव्हन स्मिथनं शतक पूर्ण केलं. तो १२१ धावांवर बाद झाला. ट्रॅव्हीस हेडनं १६३ धावा केल्या. महंमद सिराजच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. अॅलेक्स कॅरेनं ४८ धावा केल्या.या डावात भारतातर्फे महंमद सिराजनं ४ गडी बाद केले. ठाकूर आणि शामी प्रत्येकी दोन, तर जडेजानं एक बळी मिळवला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या पहिल्या डावात ३ षटकात बिन बाद २२ धावा झाल्या होत्या.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1