महत्वाच्या घडामोडी
विकसित भारत २०४७ साठी अभिनव संकल्पना गोळा करण्याची मोहीम उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुरु होणार            विष्णूदेव साय छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री            महाराष्ट्र शासनाच्या नमो महारोजगार मेळाव्याचा नागपुरात समारोप            कांदा लिलाव ३ दिवसांपेक्षा जास्त काळ बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा प्रशासनाचा इशारा            भोजनव्यवस्था असणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची परवानगी घेणं आता बंधनकारक           

Nov 22, 2023
1:32PM

उत्तराखंडमधे सिलक्यारा बोगदा दुर्घटनेतलं बचाव कार्य अद्याप जारी

AIR
उत्तरकाशीतल्या  सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांची सुटका करण्यासाठी सुरू असलेल्या बचाव कार्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सातत्यानं माहिती घेत आहेत. त्यांनी पाच वेळा उत्तराखंडचे मुख्यमंत्री  पुष्कर सिंह धामी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीची चौकशी केली. अडकलेल्या मजुरांना दिलं जाणारं भोजन, औषधं आणि इतर वस्तूंचा पुरवठा आणि बचाव कार्याविषयी प्रधानमंत्र्यांना माहिती दिल्याचं धामी यांनी सांगितलं.

बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून कामगारांना लवकरात लवकर वाचवण्यासाठी  सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य लेफ्टनंट जनरल सैद अता हसनैन यांनी काल सांगितलं. परिस्थिती खूपच आव्हानात्मक आहे मात्र तिथं कार्यरत असलेल्या एनडीआरएफ म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि भारतीय सैन्यासह विविध प्राधिकरणांनी आवश्यक ती सर्व पावलं उचलली आहेत, असं ते म्हणाले. अडकलेल्या कामगारांशी अधिक चांगल्या प्रकारे संपर्क प्रस्थापित करण्यासाठी उपकरणं पाठवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या बचाव कार्याविषयी खळबळजनक वृत्त पसरवू नये, असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दूरचित्रवाणी वाहिन्यांना सांगितलं आहे. काल जारी केलेल्या सूचनांनुसार बोगद्याच्या जवळून कोणतंही थेट प्रक्षेपण, किंवा व्हिडिओ प्रसारित करू नयेत, असा सल्ला मंत्रालयानं दिला आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1