महत्वाच्या घडामोडी
कायदेमंडळात महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्याच्या मुद्यावर काळजीपूर्वक विचार करण्याची गरज असल्याचं केंद्र सरकारकचं स्पष्टिकरण            मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २० हजाराहून अधिक खारफुटीची झाडं तोडायला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी            महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी महाविकास आघाडीची दहा डिसेंबरला आंदोलनाची हाक            मंडौस चक्रीवादळ आज मध्यरात्रीपासून उद्या पहाटेपर्यंत ममल्लापुरमजवळ पोचण्याची शक्यता            मानवाधिकारांना चालना देण्यासाठी प्रत्येकानं समर्पित भावनेनं काम करण्याचं जगदीप धनखड यांचं आवाहन           

Nov 25, 2022
3:28PM

इफ्फीमधे, भविष्यातल्या ७५ सृजनात्मक प्रतिभा या, सत्राच्या दुसऱ्या भागाची, ५३ तासांच्या आव्हानातील विजेत्यांना पुरस्कार देऊन सांगता

आकाशवाणी

गोव्यात सुरु असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीमधे, भविष्यातल्या ७५ सृजनात्मक प्रतिभा या, सत्राच्या दुसऱ्या भागाची, ५३ तासांच्या आव्हानातील विजेत्यांना पुरस्कार देऊन सांगता झाली. या स्पर्धेत देशभरातील ७५ प्रतिभावंत दिग्दर्शकांची निवड करुन त्यांना इंडीया अॅट हंड्रेड या विषयावर ५३ तासात लघुपट बनवण्याचं आव्हान दिलं होतं. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी २१ नोव्हेंबर रोजी याची घोषणा केली होती.

५३ तासात ५ लघुपट बनवण्यात आले. टीम पर्पलच्या, डियर डायरीला सर्वश्रेष्ठ लघुपटाचा पुरस्कार मिळाला. अंतरदृष्टि (द इनसाइट), द रिंग, ऑलमोस्‍ट आणि सौ का नोट हे यातले इतर चार चित्रपट आहेत. येत्या रविवारी रात्री नऊ वाजता शॉर्ट्स टिव्हीवर देशभरात हे चित्रपट दाखवले जातील. या स्पर्धेचं आयोजन राष्‍ट्रीय चित्रपट विकास प्राधिकरणानं शॉर्ट्स टिव्हीच्या सहकार्यानं केलं होत. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1