महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री आज राज्याच्या दौऱ्यावर            संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात            ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुक मतमोजणीतील ३ राज्यांमध्ये भाजपाचं वर्चस्व            पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत केनिया आणि इथियोपियाच्या धावपटूंचं वर्चस्व            ऑस्ट्रेलिया विरुद्धची वीस षटकांची क्रिकेट मालिका भारतानं ४-४ नं जिंकली.           

Sep 23, 2023
9:44AM

आशियाई क्रीडा स्पर्धेत तैपेईला नमवून भारताचा पुरुषांचा व्हॉलिबॉल संघ उपांत्यपूर्व फेरीत

AIR
चीनमधील होंगचाओ इथ सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये काल भारतीय खेळाडूंनी व्हॉलीबॉल आणि टेबल टेनिस या क्रीडा प्रकारात शानदार कामगिरी केली. जागतिक स्तरावर ७३ व्या क्रमांकावर असणाऱ्या भारताच्या पुरुष व्हॉलीबॉल संघाने, ४३ व्या क्रमांकचं मानांकन असणाऱ्या चीनी ताईपे संघाला ३-० ने हरवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आता उद्या भारतीय संघाचा सामना ऑलिम्पिक विजेता जपानच्या व्हॉलीबॉल संघाशी होणार आहे. १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धाचं औपचारिक उद्घाटन आज होणार असलं, तरी त्यातील काही स्पर्धांना या आधीच सुरुवात झाली आहे. दरम्यान, १९ व्या आशियाई स्पर्धेसाठी बीजिंगमध्ये दाखल झालेल्या काही भारतीय खेळाडूंना प्रवेश देण्याला चीन सरकारनं नकार दिला आहे. या विरोधात काल भारतात आणि बीजिंगमध्ये भारतीयांनी जोरदार निदर्शनं केली. भारतीयांना अशी दुजेपणाची आणि भेदाची वागणूक देण अत्यंत निषेधार्ह आहे, अशी टीका परराष्ट्रव्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी काल माध्यमांशी बोलताना केली.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1