महत्वाच्या घडामोडी
धावपटू मिल्खा सिंग यांचं निधन            यंदापासून अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी मराठी माध्यमाचा पर्याय            इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराबाबत सर्वंकष धोरण सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश            राज्यात कोविड 19 च्या पॉझिटीव्हिटी दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट, सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती            सारथीच्या योजनांना कुठेही पैसा कमी पडू दिला जाणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मराठा आंदोलकांच्या प्रतिनिधींना आश्वासन           

Jun 10, 2021
7:31PM

आगामी हज यात्रे संदर्भात भारत सरकार सौदी अरेबिया सरकारच्या निर्णयानुसार कार्यवाहीकरेल, केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांची माहिती

आकाशवाणी
 हज यात्रे संदर्भात भारत सरकार सौदी अरेबिया सरकारच्या निर्णयानुसार कार्यवाही करेल आणि सौदी अरेबिया सरकार जो निर्णय घेईल त्याला भारताचा पाठिंबा राहील,अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज दिली. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत हज हाऊस इथं आयोजित बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. काही देश त्यांच्या नागरिकांना हज 2021 साठी पाठवू शकत नाहीत,मात्र आम्ही सौदी अरेबिया सरकारच्या सोबत ठामपणे उभे आहोत त्या निर्णयानुसार पुढचे पाऊल उचलू, असंही ते म्हणाले.गेल्या वर्षी कोविड-19महामारीमुळे सौदी अरेबिया सरकारने त्याच देशात राहणाऱ्या विविध देशांच्या नागरिकांपुरतेच “मर्यादित हज”चं आयोजन करण्याची घोषणा केली होती. भारताचे सौदी अरेबिया मधले राजदूत डॉ. औसाफ सईद, जेद्दाहमधील भारताचे कौन्स्युल जनरल शाहीद आलम आणि केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-19 Jun 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.6 25.3
मुंबई 33.0 25.0
चेन्नई 35.4 28.6
कोलकाता 30.1 25.2
बेंगलुरू 28.0 20.8