महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Dec 24, 2019
5:30PM

सांगली जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांना राज्य बँकेकडून कर्जपुरवठा मंजूर

आकाशवाणी
सांगली जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांना राज्य बँकेनं कर्जपुरवठा मंजूर केल्यामुळे हुतात्मा, विश्वास आणि ग्रीन पॉवर शुगर हे साखर कारखाने अडचणीतून बाहेर यायला मदत होणार आहे.

वाळवा इथल्या  हुतात्मा साखर कारखान्याला ३१५ कोटी, शिराळा इथल्या विश्वास साखर कारखान्याला १५० कोटी आणि ग्रीन पॉवर शुगर या कारखान्याला १४२ कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं साखर कारखाने आणि सूतगिरण्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या संस्थांचा कर्जपुरवठा पूर्ववत सुरू झाला आहे. राज्य बँकेनं या संस्थांना मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1