महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Dec 12, 2019
9:07AM

इस्रोच्या ‘रिसॅट-टू बी.आर-वन’ या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

आकाशवाणी
इस्रो अर्थात, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन, ‘रिसॅट-टू बी.आर-वन’ या भारतीय उपग्रहाचं आज यशस्वी प्रक्षेपण केलं. हा उपग्रह कक्षेत यशस्वीरित्या स्थिरावला आहे.

पी.एस.एल.व्ही.सी- 48 या प्रक्षेपकानं या उपग्रहासह इस्रायल, इटली, जपान आणि अमेरिका या देशांचे एकूण नऊ उपग्रह अंतराळात सोडले. पी.एस.एल.व्ही प्रक्षेपकाचं हे पन्नासावं उड्डाण आहे.

रिसॅट-टू-बी आर-वन या उपग्रहावर, पृथ्वीचं निरीक्षण करण्यासाठी एक्स बॅन्ड रडार बसवण्यात आलं असून, कृषी, वन आणि आपत्ती व्यवस्थापनात या उपग्रहाचा उपयोग होणार आहे. इस्रोचे अध्यक्ष के.सिवन यांनी ही माहिती दिली.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1