महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Dec 12, 2019
9:06AM

रिसॅट टू बीआरवन या निरीक्षक उपग्रहाचं श्रीहरीकोटा इथून आज दुपारी प्रक्षेपण

आकाशवाणी
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आज रिसॅट टू बीआरवन या निरीक्षक उपग्रहाचं प्रक्षेपण करणार आहे. पीएसएलव्ही- सी ४८ या प्रक्षेपकाद्वारे श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरच्या पहिल्या प्रक्षेपण तळावरून आज दुपारी तीन वाजून २५ मिनिटांनी हे प्रक्षेपण होणार आहे. या प्रक्षेपणाची उलट गणना काल संध्याकाळी चार वाजून ४० मिनिटांनी सुरू झाली.

रिसॅट टू बीआरवन हा रडार इमेजिंग उपग्रह असून, ६२८ किलोग्रॅम वजनाच्या या उपग्रहाला ५७८ किलोमीटरवरच्या कक्षेत ३७ अंशाच्या कोनात ठेवलं जाणार आहे. पीएसएलव्हीची ही पन्नासावी मोहीम असून, रिसॅट या उपग्रहासोबतच पीएसएलव्ही- सी ४८ हा प्रक्षेपक इस्राएल, इटली, जपान आणि अमेरिकेच्या ९ उपग्रहांचं देखील प्रक्षेपण करणार आहे. न्यूस्पेस इंडियाशी झालेल्या व्यापारी करारांतर्गत या इतर उपग्रहांचं प्रक्षेपण होणार आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1