महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Nov 21, 2019
8:29PM

राज्यात राज्यपालांकडून उद्यापासून साखर कारखाने सुरू करायला परवानगी

आकाशवाणी
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्यापासून साखर कारखाने सुरू करायला परवानगी दिली. मात्र साखर आयुक्त कार्यालयानं गाळप परवाना दिलेल्या कारखान्यांनाच गाळप सुरू करता येणार आहे. परवाना न घेता गाळप करणाऱ्या कारखान्यांना दंड ठोठावण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.

साखरेचं आगार असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि  सांगली जिल्ह्यातील तब्बल २३ साखर कारखान्यांचे परवाने स्थगित करण्यात आले आहेत. साखर आयुक्त कार्यालयानं गाळप परवान्यासाठी अर्ज केलेल्यांपैकी ९९ कारखान्यांना आतापर्यंत परवानगी दिली आहे. पण एफआरपी दिली नसल्यानं कोल्हापुरातील ११ तर सांगलीतील १२ कारखान्यांचे परवाने स्थगित ठेवले आहेत.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1