महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Nov 17, 2019
2:03PM

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि अमेरिकेचे संरक्षणमंत्री डॉ. मार्क एस्पर यांच्यात बँकॉक इथं झाली द्विपक्षीय चर्चा

आकाशवाणी
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि अमेरिकेचे संरक्षणमंत्री डॉ. मार्क एस्पर यांच्यात बँकॉक इथं द्विपक्षीय चर्चा झाली. 

संरक्षण आणि सुरक्षा, अर्थव्यवस्था, ऊर्जा, दहशतवाद विरोधी लढाई आदी क्षेत्रात द्विपक्षीय संबंध दृढ झाल्यामुळे सिंग यांनी समाधान व्यक्त केलं. भारत- प्रशांत क्षेत्रातल्या मुद्यांबाबत अमेरिका आणि भारताचं एकमत होत आहे, असं ते म्हणाले. हा भाग मुक्त आणि खुला असावा, या भागाची भरभराट व्हावी, आणि या भागाची सार्वभौमता आणि अखंडता टिकावी, असा भारताचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं.

आसियान हा  भारत- प्रशांत संबंधातील केंद्रबिंदू असल्याचं ते म्हणाले. सागरी सुरक्षेत दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढीवर भर दिला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पुढच्या महिन्यात वॉशिंग्टन इथं होणाऱ्या २ अधिक २ चर्चेत  या भेटीचा फायदा होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1