महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Nov 15, 2019
3:03PM

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोग खटल्याची सुनावणी आजही सुरु राहणार

आकाशवाणी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोग खटल्याची सुनावणी आजही सुरु राहणार आहे. 

यासंदर्भात युक्रेनमधले अमेरिकेचे माजी राजदूत यांची साक्ष नोंदवली जाणार आहे.

या खटल्याच्या पहिल्या फेरीनंतर व्हाईट हाऊसनं आपली उद्दिष्ट संसदेसमोर स्पष्ट केली आहेत. साक्षीदारांना महत्त्व न देणं, आणि आपल्यावरचे आरोप फेटाळ्ल्यानंतर व्हाईट हाऊसनं आपलं लक्ष डेमोकेट्रीक पक्षाचे उमेदवार बिडेन यांच्या चौकशीवर केंद्रीत केलं आहे.

राष्ट्राध्यक्षांविरुद्धच्या या खटल्यात डेमोक्रेट्रीक पक्षाकडे कोणताही पुरावा नाही आणि डोनाल्ड ट्रम्प यांना यात विनाकारण गोवलं जात आहे, असं व्हाईट हाऊसचे ज्येष्ठ वकील केल्याने कोन्वे यांनी म्हटलं आहे. 

युक्रेनबरोबरच्या व्यवहारासंदर्भातला हा महाभियोग खटला पूर्णपणे अर्थहीन असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1