महत्वाच्या घडामोडी
जी-ट्वेन्टी परिषदेच्या निमित्तानं होणाऱ्या विविध कार्यक्रमांत सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्याचे आवाहन            रब्बी पिकांच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत २४ लाख हेक्टरची वाढ            चीनमधे पुन्हा कोविड उद्रेक            जागतिक युवा मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची 11 पदकांची कमाई            पोलीस शिपाई, चालक भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी - धनंजय मुंडे           

Nov 14, 2019
2:08PM

उत्तर प्रदेशमधल्या ऊस उत्पादक शेतक-यांसाठी उत्तर प्रदेश सरकारचं ‘ई-गन्ना अॅप’ सुरु

आकाशवाणी
उत्तर प्रदेशमधल्या ऊस उत्पादक शेतक-यांसाठी उत्तर प्रदेश सरकारनं ‘ई-गन्ना अॅप’ हे समर्पित वेब पोर्टल आणि मोबाईल‍ अॅप्लीकेशन सुरु केलं आहे. 

आता साखर कारखानदारांकडून शेतकर्‍यांना ऊस पुरवण्याबाबत ऑनलाइन पावती दिली जाईल.

शेतक-यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आखून दिलेलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपलं सरकार निरंतर काम करत आहे, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल लखनौ इथं या अॅपच्या प्रकाशन समारंभात सांगितलं.

या वेबपोर्टल आणि मोबाईल अॅ पमुळे दलाली दूर होऊन ऊसविकास संस्था अधिक बळकट होतील, असं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1