महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Nov 12, 2019
12:49PM

भारतानं बांग्लादेशाविरुद्धची टी.ट्वेंटी क्रिकेट मालिका २-१नं जिंकली, गोलंदाज दीपक चहरनं केली विक्रमी कामगिरी

आकाशवाणी

भारत आणि बांगलादेशादरम्यान काल नागपूर इथं झालेला तिसरा टी-ट्वेंटी सामना ३० धावांनी जिंकून भारतानं ही मालिकाही २-१ अशी जिंकली.

काल झालेल्या सामन्यात बांगलादेशानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं पाच गड्यांच्या मोबदल्यात १७४ धावा केल्या.

विजयासाठी १७५ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला बांगलादेशाचा संघ दीपक चहरच्या भेदक गोलंदाजीसमोर १९ षटकं आणि २ चेंडूंमध्ये केवळ १४४ धावांतच माघारी परतला.

चहरनं टी ट्वेंटी कारकिर्दीतली आजवरची सर्वोत्तम कामगिरी करत, हॅट्रिकसह केवळ ७ धावांच्या मोबदल्यात बांगलादेशाचे ६ गडी बाद केले. ही आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमधली कोणत्याही गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरीही ठरली आहे. याशिवाय चहर टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक करणारा पहिला भारतीय गोलंदाजही ठरला आहे.

चहरलाच सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1