महत्वाच्या घडामोडी
देशातल्या रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा देण्यावर भर - प्रधानमंत्री            साडे ८ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर            जालना, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरनेट बंद            २०२४-२५ पासून इयत्ता पहिलीतील प्रवेशाचं वय ६ वर्षे ठेवण्याच्या शिक्षण मंत्रालयाच्या सूचना            तिरंदाजी आशिया चषक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवली १४ पदकं           

Nov 05, 2019
5:36PM

पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या गैरव्यवहारप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

आकाशवाणी
पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कथित नऊ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी चौकशी करुन गुन्हे दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं काल कायम ठेवला.

2009 मधे राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत तत्कालीन कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या साखर कारखान्यानं हा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. सहकार खात्यानं वर्ष 2012 पासून सातत्यानं विचारणा करुनही कारखान्यानं दाद दिली नाही. शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत दादासाहेब पवार यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला कारखाना प्रशासनानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1