महत्वाच्या घडामोडी
देशातल्या रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा देण्यावर भर - प्रधानमंत्री            साडे ८ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर            जालना, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरनेट बंद            २०२४-२५ पासून इयत्ता पहिलीतील प्रवेशाचं वय ६ वर्षे ठेवण्याच्या शिक्षण मंत्रालयाच्या सूचना            तिरंदाजी आशिया चषक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवली १४ पदकं           

Oct 31, 2019
11:56AM

दिल्ली आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याची संयुक्त जनता दलाची घोषणा

आकाशवाणी
दिल्ली आणि झारखंडमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याची घोषणा संयुक्त जनता दलानं केली आहे. संयुक्त जनता दलाच्या नव्यानं स्थापन झालेल्या राष्ट्रीय परिषदेच्या नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पक्षाचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. पक्षाचे सरचिटणीस के. सी त्यागी यांनी ही माहिती दिली.

बिहार आणि अरुणाचल प्रदेशात संयुक्त जनता दलाची स्थिती मजबूत आहे, असं नीतीश कुमार यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्याचा पक्षाचा प्रयत्न राहील, असं ते म्हणाले. यामुळे भाजपशी असलेल्या संबंधांवर कोणताही विपरित परिणाम होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

नीतीश कुमार यांनाच 2022 पर्यंत पक्षाच्या अध्यक्षपदी कायम ठेवण्याचा ठरावही यावेळी झाला. अलीकडेच त्यांची या पदावर बिनविरोध निवड झाली होती.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1