महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 30, 2019
5:43PM

नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे द्राक्ष, कांदा पिकाचं नुकसान

आकाशवाणी
जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यात द्राक्ष आणि कांदा पिकाचं नुकसान झालं आहे. नाशिक जिल्ह्यात काल दुपारीही जोरदार पाऊस झाल्यानं द्राक्ष पिकांचं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर लाल कांद्याचे देखील नुकसान झाले असून यामुळे कांद्याचे भाव नजीकच्या काळात वाढण्याची शक्यता आहे.

जिल्हा प्रशासनानं त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. अमरावती जिल्ह्यातही दहा दिवसांपासून होत असलेल्या अवेळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालं असून, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.

नांदेड जिल्ह्यातल्या भोकर तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालं असून माजी मुख्यमंत्री आणि आमदार अशोक चव्हाण यांनी पीकस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याची रक्कम मिळावी, अशी मागणी त्यानी केली.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1