महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 29, 2019
12:58PM

भारतीय रेल्वेत दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठीच्या राखीव जागांवर पात्र उमेदवारांची भरती होणार

आकाशवाणी
भारतीय रेल्वेत दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या जागा, त्या जागांसाठी दिव्यांगतेच्या प्रमाणाबाबतच्या नमूद निकषांमध्ये बसणाऱ्या पात्र उमेदवारांना घेऊन लवकरच भरल्या जाणार आहेत.

यानंतरही रिक्त राहिलेल्या जागांवर इतर दिव्यांगतेच्या निकषात न बसणाऱ्या कोणत्याही व्यक्तींची नियुक्ती केली जाणार नाही असंही रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. अशा सर्व जागा पुढच्या वेळच्या कर्मचारी भरतीच्या अधिसूचनेत गृहीत धरल्या जातील, असंही प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केलं आहे. 

दिव्यांगासाठी राखीव असलेल्या जागांसाठीच्या भरतीप्रक्रियेत अनियमितता होत असल्याच्या मुद्यावरून नवी दिल्ली इथं दिव्यांग व्यक्तींनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर रेल्वेनं हे प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1