महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 27, 2019
1:35PM

तमिळनाडूत साखर उद्योगाला विशेष सवलती देण्याची ई पलानीस्वामी यांची केंद्राकडे मागणी

आकाशवाणी
तमिळनाडूमध्ये अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला विशेष सवलती देण्याची मागणी मुख्यमंत्री ई पलानीस्वामी यांनी केंद्राकडे केली आहे. या राज्यातल्या साखर कारखान्यांना बँका आणि इतर वित्तीय संस्थांनी दिलेल्या कर्जाची पुनर्रचना करण्यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लक्ष घालावं, अशी विनंती करणारं पत्र पलानीस्वामी यांनी लिहिलं आहे.

तसंच कर्ज पुनर्रचनेसंदर्भात निर्णय येईपर्यंत, थकबाकी असलेल्या कारखान्यांच्या विरोधात,  बँकांनी दिवाळखोरी कायद्यांतर्गत कारवाई करु नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे. केंद्रानं या कारखान्यांना अतिरिक्त साखर खुल्या बाजारात विकायला परवानगी द्यावी, असा आग्रह पलानीस्वामी यांनी धरला आहे.

एफआरपी मिळाला नसल्यामुळेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कर्जफेड करता आली नाही, त्यामुळे या शेतकऱ्यांची पूर्वीची थकबाकी असली तरीही त्यांना पीककर्ज द्यावं, असं पलानीस्वामी यांचं म्हणणं आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1