महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 27, 2019
9:23AM

कयार चक्रीवादळानं कोकण किनारपट्टीला झोडपलं, भातशेतीचंही मोठं नुकसान

दूरदर्शन
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कयार चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीला पावसानं झोडपून काढलं आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. मालवण, आचरा, वेंगुर्ले आणि देवगड इथं किनारपट्टीलगतच्या भागात उधाणाचं पाणी घरांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये शिरुन नुकसान झालं आहे.

या वादळाचा  फटका रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीलाही बसला आहे. वादळामुळे  दापोली तालुक्यातल्या हर्णे बंदरातल्या सुमारे ८० छोट्या होड्या लाटांच्या तडाख्यात वाहून गेल्या. या वादळामुळे परराज्यातल्या सातशे नौका रत्नागिरी किनाऱ्यावर आश्रयाला आहेत.

कोकणात झालेल्या या पावसाचा फटका भात शेतीला मोठ्या प्रमाणात बसला असून भातशेतीचं मोठं नुकसान झालं आहे.

समुद्रावर जाताना जनतेनं काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. पुढच्या २४ तासात कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1