महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 24, 2019
8:30PM

विदर्भ : विदर्भ मतदारसंघातील निकालाचा आढावा

आकाशवाणी
नागपूरमधे 12 विधानसभा मतदासंघापैकी 7 ठिकाणी भारतीय जनता पक्ष तर काँग्रेस 3 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना बंडखोर प्रत्येकी एका ठिकाणी विजयी आघाडीवर असलेल्या भाजपा उमेदवारामधे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मोहन मते, विकास कुभारे, कृष्णा खोपडे, सुधीर पारवे आणि समीर मेघे यांचा समावेश आहे.

रामटेक मतदार संघात शिवसेनेचे बंडखोर आशिष जयस्वाल आणि काटोलमधे राष्ट्रवादीचे अनिल देशमुख विजयी झाले आहेत. तर काँग्रेसचे विकास ठाकरे सुरेश भोयर आणि सुनील केदार विजयाच्या मार्गावर आहेत. 

वर्ध्यामधे चार पैकी तीन मतदारसंघात भाजपा बाजी मारली आहे. यात अर्वीचे दादाराव केचे, हिंगणघाटमधे समीर कुणावार, वर्धा इथं पंकज भोयर यांचा समावेश आहे. देवळी इथं मात्र काँग्रेसचे रणजित कांबळे विजयी झाले. 

अकोल्यामधे अकोट आणि अकोला पूर्व मतदारसंघात भाजपाचे प्रकाश भारसाकळे आणि रणधीर सावरकर विजयी झाले. मुर्तिजापूर इथं वंचित आघाडीच्या प्रतिभा अवचार आणि अकोला पश्चिम इथं काँग्रेसचे साजिद खान पठाण विजयी झाले. 

बुलढाणा जिल्ह्यात  सात जागांपैकी पाच जागा युतीकडे गेल्या आहेत. बुलढाणा इथून शिवसेनेचे संजय गायकवाड विजयी झाले आहेत. तर मेहकरमधून शिवसेनेचे संजय रायमुलकर विजयी झाले आहेत. जळगाव जामोद इथं संजय कुटे, खामगावमधे आकाश फुंडकर आणि चिखलीतून श्वेता महाले हे भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र सिंदखेड राजा इथून राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे आणि मलकापूरमधून काँग्रेस राजेश एकडे विजयी झाले आहेत. 

वाशिम जिल्ह्यातल्या वाशिम आणि करंजा या दोन्ही जागी लखन मलिक आणि राजेंद्र पाटणी यांनी बाजी मारली. 

भंडा-यात अपक्ष उमेदवार नरेंद्र भोंडकर, तुमसरमधे राष्ट्रवादीचे राजीव कारमोरे, यवतमाळ तसंच, आर्णी इथून काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर आणि शिवाजी  मोघे विजयी झाले आहेत. तर उमरखेड, वणी, राळेगाव इथे भाजपा उमेदवार विजयी आहेत.  दिग्रसमधे शिवसेनेनं आघाडी घेतली. 

अमरावती जिल्ह्यात अचलपूर इथं  प्रहार संघटनेचे बच्चु कडू तर मेळघाटमधे अपक्ष राजकुमार पटेल, दर्यापूर आणि तिवसामधे काँग्रेस आघाडीचे बळवंत वानखेड आणि यशोमती ठाकूर या विजयी झाल्या आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात पूसद मतदारसंघात राष्ट्रवादीचे इंद्रनिल नाईक विजयी झाले आहेत.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1