महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 23, 2019
4:02PM

धुळे तालुक्यातील कापडणे भातनदीला पूर

आकाशवाणी
धुळे शहरासह जिल्ह्याला काल पावसाने अक्षरशः झोडपून काढलं . शहरात तीन तास जोरदार पाऊस झाला, रात्रीही पावसाची रिपरिप सुरुच होती. यामुळे हुडकोमधील पवननगर,जामचा मळा तसेच सखल भागातल्या घरांमध्ये पाणी शिरले. यामुळे संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

तसंच धुळे तालुक्यातील कापडणे इथल्या  भातनदीला पूर आला. नदीकाठावरील पंधरा कुटुंबांना सुरक्षीत स्थळी हलवण्यात आलं.  अक्कलपाडा, वाडीशेवाडी धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

धुळे जिल्ह्यात आजही  पावसाचा मुक्काम कायम आहे. धुळे, साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये आजही पावसाची सततधार सुरु आहे. शेतांमध्ये पाणी साचल्यानं कापूस, सोयाबीन, कांदा आदि पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. धुळ्यात एका तरुणीचा डेंग्यूनं मृत्यू झाल्याची माहितीही आमच्या वार्ताहरानं कळवली आहे. रायगड जिल्हयात भातशेती कापणीचा हंगाम सुरू आहे.

अनेक शेतकर्यांणनी शेतात भात कापून ठेवला आहे, तर काही शेतकरी कापणी करत आहेत. अशा स्थितीत पाऊस कोसळत असल्यानं जिल्हयातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील भातपीक धोक्यात आलं आहे. सांगली जिल्ह्यात माणगंगा, अग्रणी नद्यांना पूर आला असून नदीकाठच्या लोकांना प्रशासनानं सावधानतेचा इशारा दिला आहे. आटपाडी, खानापूर, तासगाव, कवठे महांकाळ, जत तालुक्यातले प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

पाणी साचल्यामुळे खरिपाचं पीक बाद होण्याचा धोका निर्माण झाला आहे.जालना जिल्ह्यात रात्रभर झालेल्या पावसामुळे कुंडलिका नदीला पूर आला असून नदीवरचा रामतीर्थ बंधारा ओसंडून वाहत आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1