महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 21, 2019
1:06PM

दहशतवाद्यांना संरक्षण देणारे पाकिस्तानचे दहा जवान ठार

आकाशवाणी
पाकव्याप्त काश्मीर मधल्या निलम खो-यातल्या दहशतवादी तळांवर आणि दहशतवाद्यांना संरक्षण देणाऱ्या पाकिस्तानी सेनेच्या चौक्यांवर भारतीय लष्करानं काल हल्ल्यात पाकिस्तानचे दहा जवान मारले गेले.

लष्करानं केलेल्या या कारवाईत दहा दहशतवादीही ठार झाले असून भारतीय सैन्याच्या या कारवाईमुळे नियत्रंण रेषेवरच्या दहशवाद्यांच्या आड्याना मोठं नुकसान पोहचल्याचं लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी म्हटलं आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या संख्येबाबत अधिक माहिती प्राप्त केली जात आहे असं ते म्हणाले.

लष्कराने अथमुकम, कुंदलशाही,  जूरा  आणि लिपा खो-यातला एक तळ उद्धवस्त केला. प्रत्युत्तर दाखल केलेल्या या कारवाईची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना देण्यात आल्याचं रावत म्हणाले. सैनिकांना दहशतवादी चौक्यांजवळ येत असल्याची माहिती मिळाली होती, असं ते म्हणाले.

गेल्या महिन्याभरात गुरेज, केरन, माचिल, उरी क्ष्रेत्र आणि पीरजंपजालच्या दक्षिण भागात वारंवार घुसखोरीचे प्रयत्न केले गेले असं रावत म्हणाले. दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. 

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1