महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 20, 2019
8:36PM

जपानमध्ये G-20 संमेलनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सबका साथ- सबका विकास-सबका विश्वास घोषणा

आकाशवाणी
जपानमध्ये सुरु असलेल्या G-20 ओकायामा आरोग्यमंत्री संमेलनात भारतानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ- सबका विकास- सबका विश्वास या घोषणेचा  तसंच आयुष्यमान भारत आरोग्य योजनेचा विशेष उल्लेख केला आहे.

जपानमध्ये ओकायामा इथं सुरु असलेल्या या संमेलनात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन भारताचं प्रतिनिधित्व करत असून त्यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्या फिट इंडिया मूव्हमेंट आणि  ईट राइट केंपैन या योजनांचा उल्लेख केला.

सर्वसमावेशक आरोग्य सेवा पुरवण्यावर भारताचा भर असल्याचं डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी सांगितलं. ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या लोकसंख्येसाठी परवडण्याजोगी, सहज उपलब्ध आणि दर्जेदार सेवा देण्याचा भारताचा प्रयत्न असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1