महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 20, 2019
6:06PM

रेल्वेचा कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्देशानं रेल्वे मंडळाची पुनर्रचना करायचा निर्णय

आकाशवाणी
रेल्वेनं आपली कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्देशानं रेल्वे मंडळाची पुनर्रचना करायचा निर्णय घेतला आहे. यानुसार, संचालक स्तरावरच्या अधिका-यांची विभागीय रेल्वेत बदली करुन ही संख्या 200 हून कपात करुन 150 वर आणली जाणार आहे. याआधी, वाजपेयी सरकारनं 2000 साली अशा प्रकारचा निर्णय घेतला होता.

बिबेक देब्रॉय समितीनं 2015 मधे रेल्वे मंडळाची पुनर्रचना करायची शिफारस केली होती. रेल्वे तसंच रेल्वे मंडळाची कर्मचारी संख्या गरजेपेक्षा जास्त असल्याचं याआधीही निदर्शनाला आल्याचं रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यानं सांगितलं.

नुकत्याच झालेल्या बैठकीत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही के यादव आणि इतर वरिष्ठ अधिका-यांना कर्मचारीसंख्येचा फेर आढावा घ्यायचे निर्देश दिले होते.  

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1