महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 18, 2019
1:32PM

दिव्यांग मतदारांची ऑयकॉन : कुस्तीपटू वैष्णवी मोरे

आकाशवाणी
भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांसाठी ‘सुलभ निवडणुका’ असे घोषित केले आहे. त्यानुसार दिव्यांग मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर विविध सुविधा पुरविण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून दिव्यांग मतदारांमध्ये जनजागृती होवून त्यांनी मतदानासाठी पुढे यावे म्हणून दिव्यांग असलेली कुस्तीपटू वैष्णवी बाला मोरे हिला धुळे जिल्ह्यासाठी दिव्यांग मतदारांची आयकॉन म्हणून जिल्हा प्रशासनाने घोषित केले आहे. तिच्याबरोबरच अंध कलावंत प्रवीण पाटील, प्रसिध्द सूत्रसंचालक वाहिद अली सय्यद हे सुध्दा दिव्यांग मतदारांचे आयकॉन असणार आहेत.

धुळे शहरातील देवपूर परिसरात वैष्णवीचे वास्तव्य आहे. आपल्या समोर उभी राहिली, तर तिला कुणीही दिव्यांग म्हणणार नाही. वयाच्या चौथ्या वर्षी कर्णबधिर असल्याचे तिच्या आईवडिलांच्या लक्षात आले. वैष्णवीला तीन बहिणी आणि एक भाऊ. वडील मजुरीवर उदरनिर्वाह करतात, तर आई गृहिणी आहे. घरची परिस्थिती जेमतेम असूनही तिच्या आईवडिलांनी तिच्यावर धुळे, जळगाव, मुंबई येथे औषधोपचार केले.

धुळ्यातीलच रघुनाथ केले वाकश्रवण विद्यालयात तिने सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. ती आता महाराणा प्रताप विद्यालयात आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.

वैष्णवीचे आजोबा आणि काका मल्ल म्हणून धुळे परिसरात प्रसिध्द होते. त्यामुळे दिव्यांग असली तरी वैष्णवीला खेळांची आवड निर्माण झाली. तिची आवड रघुनाथ केले वाकश्रवण विद्यालयातील कोमल करडक यांच्या सारख्या शिक्षिकांनी जोपासली. तिला प्रोत्साहन दिले.

त्यामुळे वैष्णवी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, अपंग कल्याण आयुक्तालयातर्फे दिव्यांगांच्या धावणे, गोळाफेक आदी स्पर्धांमध्ये सहभागी होवू लागली. या स्पर्धांमध्ये तिला यशही मिळू लागले. तिने विविध पदके पटकावली. मात्र, तिला खरी आवड होती ती कुस्तीमध्ये.

 तिला मल्ल असलेले काका सुदाम चौधरी व जगदीश चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. तिने कुस्तीतच आपले करिअर करण्याचे ठरिवले आहे. तिची विविध स्तरावरील स्पर्धांमधून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वैष्णवी दिव्यांग असली, तरी सामान्य मुलींबरोबरही कुस्ती खेळून त्यांना लोळविते. ती फ्री स्टाइल ग्रीको रोमन या प्रकारात खेळते. मल्ल विद्या आत्मसात करण्यासाठी तिची आव्हाने पेलण्याची तयारी आहे.

रोज सकाळी उठून धावणे, शारीरिक कसरती ती करीत असते. मोटारसायकल उत्कृष्टपणे चालविते, तर मोबाईलवर व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून आईवडील, प्रशिक्षक, मैत्रिणींशी संपर्क साधते.

विविध क्रीडा प्रकार खेळण्यात अग्रेसर असलेली वैष्णवी दिव्यांग मतदार बांधवांना मतदान करण्याचे सांकेतिक भाषेत आवाहन करीत असते. त्यासाठी तिला शिक्षिका कोमल करडक यांचे नेहमीच सहकार्य लाभते. दिव्यांग असले, तरी मतदान करा, असा आग्रह वैष्णवी सांकेतिक भाषेतून करीत असते.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1