महत्वाच्या घडामोडी
अवयव दानाचं महत्त्व, नवरात्रीनिमित्त नारीशक्तीचा गौरव, सौर ऊर्जेला प्रोत्साहन, इत्यादींवर मन की बात च्या ९९ व्या भागात प्रधानमंत्र्यांचा संवाद            एकेकाळी ईशान्य प्रदेश नाकाबंदी आणि हिंसाचारासाठी ओळखला जात होता, पण आता हा प्रदेश विकास कार्य आणि सर्वांगीण प्रगतीसाठी ओळखला जातो - प्रधानमंत्री            राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर            पहिल्या ‘दिल्ली-धरमशाला-दिल्ली’ विमान सेवेला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री यांनी दाखवला हिरवा झेंडा            जागतिक महिला मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत, भारताची मुष्टी योद्धा निखत झरीन हिनं ५० किलो वजनी गटात पटकावलं सुवर्ण पदक           

Oct 16, 2019
1:06PM

महिला कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी महिला नोडल अधिका-यांची नेमणूक

आकाशवाणी
महिलांसाठीच्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं काही महिला अधिका-यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली असून त्यांना त्या त्या जिल्ह्यात जाण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी, ही माहिती दिली. ते लखनौ इथं महिला नोडल अधिका-यांना संबोधित करत होते.

तीन तीन महिला अधिका-यांचे गट केले असून त्या येत्या 18, 19 आणि 20 ऑक्टोबरला त्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यात जाणार आहेत. उज्ज्वला योजना, मिशन इंद्रधनुष्य तिहेरी तलाक आणि स्त्रियांच्या सुरक्षेसाठी विविध उपाय यासारख्या विविध सरकारी योजनेंची स्त्रियांना माहिती करुन देणे तसंच प्रोत्साहन देणे इत्यादी कामे करुन या महिला नोडल अधिकारी 25 ऑक्टोबरला ‘कन्या समुंगाला’ योजनेच्या उद्धाटनाच्या आधी याबाबतचा विस्तृत अहवाल सादर करतील.   

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1