महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 19, 2019
9:59AM

भारत आपल्या वाटयाचं पाणी पाकिस्तानात वाहून जाऊ देणार नाही : नरेंद्र मोदी

आकाशवाणी
भारत आपल्या वाटयाचं, नद्यांचं पाणी पाकिस्तानात वाहून जाऊ देणार नाही, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल हरयाणात चरखी दाद्री इथं निवडणूक प्रचार सभेत बोलत होते.

भारताच्या आणि हरयाणातल्या शेतक-यांच्या हक्काचं पाणी गेली 70 वर्षे पाकिस्तानला जात आहे. आपलं सरकार हे पाणी राखून हरयाणातल्या घरांपर्यंत पोचवेल, असं त्यांनी सांगितलं. गेल्या पाच वर्षात भाजपा सरकारनं विकासाचा पाया घातला, असं मोदी म्हणाले.

देशाच्या विकासात खेड्यांची भूमिका सांगताना ते म्हणाले की गावं हा नवी उर्जा आणि सामाजिक बदलांचा स्त्रोत ठरला आहे. आपली संस्कृती आणि परंपरा जपतानाच समाजाला नव्या विचारपद्धती आणि नव्या मार्गाकडे नेण्याचे काम खेडी करत आहेत, असं मोदी म्हणाले. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1