महत्वाच्या घडामोडी
सहकार क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या साठवणूक योजनेचा प्रधानमंत्र्यां च्या हस्ते दिल्लीत प्रारंभ            प्रेस इन्फोरेशन ब्युरोच्या फॅक्ट चेककडून समाज माध्यमांवर फिरत असलेल्या शेतकऱ्यांच्या निषेधाच्या छायाचित्रांबद्द्ल सतर्कतेचे आदेश            संरक्षण क्षेत्रात येत्या पाच वर्षात देश पन्नास हजार कोटींच्या निर्यातीचं लक्ष्य साध्य करेल संरक्षण मंत्र्याचं प्रतिपादन            देशातल्या सर्वात मोठ्या डिफेन्स एक्स्पोचं पुण्यात उद्घाटन            चौथ्या क्रिकेट कसोटीत भारताची अडखळत सुरुवात           

Oct 15, 2019
7:35PM

नाशिकमध्ये शिवसेनेच्या ३४ नगरसेवकांचा राजीनामा

आकाशवाणी
नाशिक पश्चिम मतदारसंघाची जागा शिवसेनेला न सुटल्याने नाराज झालेले शिवसेनेचे 34 नगरसेवक आणि साडे तीनशे पदाधिकाऱ्यांनी आज आपल्या पदाचे राजीनामे दिले. अंबड इथं एका वार्ताहर परिषदेत ही घोषणा  करण्यात आली.

नाशिक पश्चिम मतदार संघात शिवसेनेचे 22 नगरसेवक असून त्या तुलनेत भाजपचं संख्याबळ नाही. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांना सलग दोन निवडणुकात लाख मतांपेक्षा अधिक मताधिक्य याच मतदारसंघात मिळालं होतं.

परंतु सध्या हा मतदारसंघ भाजपकडे असून भाजपच्या आमदार सीमा हिरे यांना सलग दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे शिवसेनेचे विलास शिंदे यांनी बंडखोरी केली असून त्यांना स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1