महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 14, 2019
5:12PM

शिवसेना बंडखोर उमेदवार विजय माने यांची निवडणुकीतून माघार

आकाशवाणी
बेलापूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे शिवसेना बंडखोर उमेदवार विजय माने यांनी आज निवडणुकीतून माघार घेतली आहे. सानपाडा इथं आयोजित केलेल्या एका वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेच्या सांगण्यावरून उमेदवारी मागे घेत असल्याची माहिती माने यांनी दिली.नवी मुंबईतले बेलापूर आणि ऐरोली हे दोन विधानसभा मतदारसंघ भाजपाला देण्यात आल्यामुळे शिवसैनिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता.

त्यातूनच माने यांनी या निर्णयाविरोधात आंदोलन करून शिवसेना शहर प्रमुख पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1