महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 12, 2019
6:31PM

विधानसभा निवडणूकीचा प्रचार शिगेला,सत्ताधारी आणि विरोधकांच्या परस्परांवर आरोपांच्या फैरी

Election Commission and DD
राज्य विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. प्रमुख राजकीय पक्ष झंजावाती सभा, प्रचारफेऱ्या, वार्ताहर परिषदेच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला पराभव मान्य केला आहे हेच, त्यांच्या जाहीरनाम्यातून दिसून येतं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज अकोला जिल्ह्यात अकोट इथं प्रचारसभेत बोलत होते. राज्यात पुढल्या पंधरा वर्षातही आघाडीचं सरकार येणार नाही, असा दावा त्यांनी केला. राज्याच्या इतिहासात पहिलीच विधानसभा निवडणूक आहे, ज्यात विरोधीपक्षांचं अस्तितत्वच दिसत नाही, अशी खिल्ली त्यांनी यावेळी उडवली. अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर इथंही मुख्यमंत्र्यांची आज प्रचारसभा झाली.

विकासाच्या राजकारणाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिशा दिली आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज लातूर जिल्ह्यात देवणी इथं प्रचारसभेत बोलत होते. उदयोग क्षेत्रासाठी नवं धोरण आणणार आहोत, यात ग्रामीण भाग समृद्ध करण्यावर भर दिला जाणार आहे, असं ते म्हणाले. शेतकर्‍यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर वाहनं चालवली जातील, या ध्येयाअंतर्गत विदर्भातले सहा जिल्हे डिझेलमुक्त केले जातील, असं आश्वासन त्यांनी दिलं. लातूरमधला पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं ते म्हणाले. 

भाजपाचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांची आज जालना जिल्ह्यातल्या अंबंड इथं जाहीरसभा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

शिवसेनेच्या जाहीरनाम्याचं आज मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रकाशन झालं. बचतगटांच्या महिलांना सहकार्य, दहा रुपयांत गरिबांना अन्न, गरिबांसाठी एक रुपयात आरोग्य चाचण्या अशी आश्वासनं यात मांडली आहेत. राज्याच्या तिजोरीवर किती भर पडेल याचा अंदाज घेऊन शिक्षण आणि आरोग्याला प्राधान्य देणाऱ्या योजनांचाही जाहीरनाम्यात समावेश केल्याचं उद्धव ठाकरे यांनी वार्ताहरांना सांगितलं.

निवडणूकीत समोर टीकाकार असायला हवा, पण आमच्यासमोर विरोधकच नाहीत, अशी खिल्ली शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज धुळ्यात उडवली. युतीच्या जाहीरनाम्यातील सर्व आश्ववासनं शिवसेना पूर्ण करेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. एक रुपयात आरोग्य चाचणी, दहा रुपयामध्ये सकस जेवण यासारख्या योजना शिवसेना अंमलात आणेल, असं आश्वासन त्यांनी दिलं. त्यांची आज दिंडोरी आणि नंदूरबार सभा झाली, आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. धनगरांना त्यांच्या न्याय हक्काने आरक्षण देवू, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.  

राज्यातलं सरकार सर्वच आघाडयांवर अपयशी ठरल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ते आज सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी इथं प्रचारसभेत बोलत होते. शिवाजी महाराजांच्या नावानं सरकारनं खोटी आश्वासनं दिली अरबी समुद्रात एक वीटही उभी केली नाही, निवडणूकीत समोर लढायला कुणीच नाही असं म्हणणारे मुख्यमंत्री राज्यभर का फिरत आहेत, असं ते म्हणाले. शिवसेनेच्या दहा रुपयात जेवण या योजनेवर तुम्हाला राज्य चालवायचं आहे, स्वयंपाक करायचा नाही अशी टीका त्यांनी केली. 

वंचित बहुजन आघाडीनं खर्‍या अर्थानं लोकशाहीचं सामाजीकरण केलं आहे, असं जातीआधारित राजकारण करणार्‍यांना हे उत्तर असल्याचं पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते आज नांदेड जिल्ह्यात किनवट  इथं प्रचारसभेत बोलत होते. आतापर्यंत राज्यात सरकार कुणाचंही असो, तरुणांसाठी कोणतीच योजना राबवली गेली नाही, त्यामुळे बेरोजगारी प्रचंड वाढली. आदिवासी विकासाच्या योजना फक्त कागदावरच राहिल्या अशी टीका त्यांनी केली. 

गेल्या पाच वर्षात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारच्या काळातील  कारभारामुळे प्रगतशील महाराष्ट्र १० वर्ष  मागे गेला  आहे, अशी टीका माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केली. ते आज लातूर इथं प्रचारसभेत बोलत होते. एमआएमचे अध्यक्ष असदुद्दिन ओवेसी यांची आज अकोल्यात बाळापोर इथं सभा झाली. देशात सक्षम विरोधी पक्ष उरलेला नाही. कुठेही धर्मनिरपेक्षता दिसत नाही, आमचा पक्ष संविधानावर आधारित लोकशाही निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असं सांगत त्यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1