महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Oct 12, 2019
6:04PM

विदर्भातल्या ६२ मतदारसंघातून एकुण ५७ महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

आकाशवाणी
राज्य विधानसभा निवडणुकीत विदर्भातील 62 मतदारसंघात एकुण 751 उमेदवार निवडणूक लढणार आहेत. यापैकी 24 मतदारसंघामध्ये एकही महिला उमेदवार नाही. विदर्भातील 38 मतदारसंघात 57 महिला उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यातील सर्वात जास्त 15 महिला उमेदवार नागपूर जिल्ह्यात आहेत.

वर्धा, वाशिम आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये एक-एक महिला उमेदवार आपलं नशीब आजमावित आहेत. कांग्रेस पक्षानं सहा महिला उमेदवारांना निवडणूक मैदानात उतरविले आहे. विदर्भात भाजपातर्फे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघातून एकमेव महिला उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. विदर्भाच्या बारा जागांवर लढत देणाऱ्या शिवसेनेनं दोन महिला उमेदवाराना निवडणुकीसाठी संधी दिली असून,  बहुजन समाज पार्टीतर्फे विदर्भातील 62 मतदारसंघामध्ये सहा महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. 

आम आदमी पक्षानं केवळ एका महिला उमेदवारास उमेदवारी दिली आहे. प्रकाश आंबेडकरच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीच्या तीन महिला उमेदवारांना संधी दिली तर, राष्ट्रवादी कांग्रेसनं मात्र एकाही महिला उमेदवारास या निवडणुकीत संधी दिलेली नाही.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1