महत्वाच्या घडामोडी
सहकार क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या साठवणूक योजनेचा प्रधानमंत्र्यां च्या हस्ते दिल्लीत प्रारंभ            प्रेस इन्फोरेशन ब्युरोच्या फॅक्ट चेककडून समाज माध्यमांवर फिरत असलेल्या शेतकऱ्यांच्या निषेधाच्या छायाचित्रांबद्द्ल सतर्कतेचे आदेश            संरक्षण क्षेत्रात येत्या पाच वर्षात देश पन्नास हजार कोटींच्या निर्यातीचं लक्ष्य साध्य करेल संरक्षण मंत्र्याचं प्रतिपादन            देशातल्या सर्वात मोठ्या डिफेन्स एक्स्पोचं पुण्यात उद्घाटन            चौथ्या क्रिकेट कसोटीत भारताची अडखळत सुरुवात           

Oct 12, 2019
8:04PM

नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यातल्या अनौपचारिक शिखर बैठकीचा आज दुसरा दिवस

आकाशवाणी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातल्या अनौपचारिक शिखर बैठकीचा आज दुसरा दिवस आहे. आज सकाळी दहा वाजल्यापासून उभय नेत्यांची चर्चा पुढं सुरु होईल. मोदी आणि जिनपिंग यांच्यात काल सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा झाली. विविध राष्ट्रीय विषयांवर तसंच सरकारी धोरणांच्या प्राधान्य क्रमाबाबत अनेक मुद्यांवर सुमारे पाच तास चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
भारत आणि चीन दोन्ही भौगोलिकदृष्ट्या विशाल आणि विविधतेनं संपन्न देश असून, त्यात मूलतत्ववादी विचारसरणीचा प्रसार हा त्यांच्या समृद्ध संस्कृतीला धोका असल्याचं दोन्ही नेत्यांमधे एकमत झालं. अशा प्रकारचे कट्टरतावादी विचार वेळीच रोखले पाहिजे, असंही यावेळी मांडण्यात आलं.
उभयपक्षी व्यापार, संख्या आणि दर्जाने वृद्धींगत करण्यावर यावेळी चर्चा झाली. दोन्ही देशांच्या आर्थिक प्रगतीसाठी मिळून काम करायचं मोदी आणि जिनपिंग यांनी ठरवलं. महाबलीपूरम इथल्या मंदिर संकुलाची दोघांनी एकत्र सफर केली. सांस्कृतिक कार्यक्रम आणि भोजनाचा आस्वाद घेतला. तसंच चीनमधल्या फुजीयन प्रांताबरोबरच्या ऐतिहासिक तमिळी संबंधांना आणि बौद्ध धर्माच्या निमित्ताने भारत-चीनदरम्यान प्रस्थापित झालेल्या संबंधांना या भेटीत उजाळा मिळाला.
या अनौपचारिक भेटीसाठी चीनच्या अध्यक्षांचं काल विशेष विमानाने चेन्नई विमानतळावर आगमन झालं. या सौहार्दपूर्ण स्वागतासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे त्यांनी आभार मानले. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1