महत्वाच्या घडामोडी
आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मत देण्याची संधी असलेल्यांनी विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन            प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुदर्शन सेतूचं उद्घाटन            आंतरराष्ट्रीय लवाद क्षेत्रात युवकांना मोठी संधी असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन            महाराष्ट्रातल्या सुमारे २२३ कोटी रुपये खर्चाच्या विविध आरोग्यसुविधा प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमीपूजन            चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव ३०७ धावांवर समाप्त           

Oct 11, 2019
8:31PM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात आज अनौपचारिक चर्चा, उद्या अनौपचारिक शिखर बैठक

आकाशवाणी
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यातल्या अनौपचारिक चर्चेला आज सुरुवात झाली. तामिळनाडूतल्या मल्लापूरम इथं प्रधानमंत्री मोदी यांनी शी जिनपिंग आणि इतर चिनी पाहुण्यांचं आज स्वागत केलं. त्यानंतर तिथल्या ऐतिहासिक वारसा स्थळांना त्यांनी भेट दिली. त्यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी जिनपिंग यांना वारसास्थळांचं ऐतिहासिक महत्त्व कथन केलं.

त्यानंतर दोन्ही नेत्यांनी पंचरथ या स्थळाला भेट देऊन तिथं विविध विषयांवर अनौपचारिक चर्चा केली. दोन्ही देशाच्या नेत्यांमधली उद्या सुरु होणारी अनौपचारिक शिखर परिषद एकूण सहा तास चालणार असून त्या दरम्यान 40 मिनिटं या दोघांमधे समोरासमोर चर्चा होईल आणि त्यानंतर शिष्टमंडळ स्तरीय चर्चा होईल.

चीनच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळात चीनचे परराष्ट्रमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा समावेश असून भारताच्या बाजूनं भारताचे परराष्ट्र एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल प्रधानमंत्र्यांसोबत सहभागी होणार आहेत.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1